Sunday 19 August 2012

Mom's Special Khandvi



माझी आई घरी गणपती असताना दर वर्षी हि मिठाई आवर्जून बनवते! त्यामुळे मी पण शिकायचा ठरवला आणि आज हि recipe इथे share करते आहे





साहित्य 


  • तांदळाचा रवा - 1 वाटी 
  • किसलेला गुळ  - 1 वाटी 
  • वेलची पूड  - 1 छोटा चमचा 
  • किसलेला ओलं खोबरं - 1 मोठा चमचा 
  • तूप 
  • पाणी 



कृती


  • तांदळाचा रवा थोड्या तुपावर भाजून घ्यावा. 
  • एका मोठ्या भांड्यात 2 वाट्या पाणी उकळत ठेवावा, त्याला चांगली उकळी आली कि त्यात गुळ  घालावा.
  • गुळ विरघळा कि मग त्यात भाजलेला इडली रवा घालावा आणि झाकण ठेवून एक वाफ काढावी 
  • वाफ काढल्यावर त्यात वेलची पूड घालावी 
  • हे मिश्रण चांगले एकजीव करावे आणि घट्ट व्हायला लागल्यास gas  बंद करावा 
  • तूप लावलेल्या थाळ्यात  हे मिश्रण ओतावे आणि चांगले एकसर  पसरावे 
  • थंड झल्यावर त्याचा वाड्या पाडाव्यात .
  • ह्या वाड्यांवरून ओले खोबरे भुर्भूर्व्हायचे .

No comments:

Post a Comment